मुंबई : महान्यूज लाईव्ह
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोविडच्या नव्या प्रकारामुळे जगभर पुन्हा सतर्कता बाळगली जात आहे. त्याचे ताजे अपडेट सोबत प्रमाणे,
महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यासाठी व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य ठरविले आहे. नियम तोडणाऱ्यास रु.५०० ची दंड भरावा लागेल.
ज्या वाहनामध्ये नियमभंग करणारा प्रवासी आढळेल, त्या वाहन मालकाला रु.१०००० चा दंड भरावा लागेल.
कोणत्याही कार्यक्रमासाठी किती लोक उपस्थित राहू शकतील त्याचे नियमही राज्यसरकारने जाहिर केले आहेत. यामध्ये उघड्या जागेवरील कार्यक्रमासाठी कार्यक्रम स्थळाच्या उपस्थिती क्षमतेच्या २५ टक्के तर बंद जागेत उपस्थिती क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी असेल.
जगभरात नव्या कोविडबाबतच्या ताज्या घडामोडी थोडक्यात,
१. इंग्लंडमध्ये ओमिक्रॉन कोवीडचे २ रुग्ण सापडले
२. नेपाळने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी ७ दिवस कॉरंटाईन जाहीर केला.
३. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नव्या कोविड विषाणूबाबत बैठक बोलावली.
४.जर्मनीमध्ये ओमिक्रॉन कोविडचा एक संशयित सापडला.
कोवीडच्या संकटातून आपण बाहेर पडलो आहोत अशा आत्मविश्वासाने सगळ्या जगाने वाटचाल सुरू केली होती, परंतू दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या प्रकारच्या ओमिक्रॉन कोविड मुळे पुन्हा एकदा सतर्क राहून याचा सामना करावा लागणार आहे.











