
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा इंदापूर तालुक्यात जणू गावागावात शिरकाव होऊ लागला आहे असे चित्र सध्या दिसत असून, आज उद्धट मध्ये नव्याने कोरोनाचा एक रुग्ण रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास कोरण्याची लागण झाली आहे.
इंदापूर शहरासह तालुक्यातील शिरसोडी, पोंदकुलवाडी, गणेशवाडी, भिगवण, लाकडी, बोरी, जंक्शन, कळंब, या गावांमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पश्चिम भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. आज उध्दट येथील पुणे जिल्हा बँकेत अधिकारी असलेल्या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे अधिकारी नेमणुकीस पुणे येथे असतात, परंतु ते सध्या येथे मुक्कामी होते. दोन दिवसापूर्वी त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
निम्मा तालुका लाँकडाऊन
गेल्या काही दिवसात सातत्याने कोरोनाचे रुग्ण इंदापूर तालुक्यात आढळत असल्याने शेळगाव पासून भवानीनगर पर्यंतचा परिसर सध्या लाँकडाऊन असून या भागात अघोषित संचारबंदी असल्यासारखेच चित्र दिसत आहे. बोरी येथे रुग्ण सापडल्यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी परिसरातील काही गावांचा परिसर हा बफर झोन म्हणून निश्चित केला आहे, त्यामुळे या भागात सध्या दैनंदिन व्यवहार बंद आहेत.











कोरोना हारेगा ,देश जीतेगा.