अहमदनगर : महान्युज लाईव्ह
अमोल होरणे

गेल्या अनेक वषांपासून प्रलंबित असलेला व नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे .
अहमदनगर शहरामध्ये सततची होणारी वाहतूक कोंडी ‘कमी करण्यासाठी या उड्डाणपुलाचे नवनिर्माणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हॉटेल अशोका पासून ते सक्कर चौकापर्यंत हे काम होणार आहे.
या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते.त्यामुळे या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी होत असते .या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा सध्या नगरकर करत आहेत .











