दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील भागवतवाडी परिसरातील एका वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल खासगी लॅबकडून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे व आरोग्यसेवक भिमराव बडे यांनी दिली.
पाटसमधील डॉक्टर दांपत्यांनी दोन दिवसापुर्वी कोरोनावर मात केली असतानाच आज भागवतवाडी परिसरात नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने पाटसकरांची चिंता अधिक वाढली आहे. पाटसमध्ये २३ जून ला डॉक्टर दांपत्यां कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संबंधित रूग्णालयातील दोन महिला कर्मचारी व एका सहायकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानंतर आरोग्य विभागाने संपर्कातील आलेल्या सुमारे १०६ व्यक्तींचा शोध घेवून कोरोना तपासणी केली असता त्यांचा तपासणी निगेटिव्ह आला, मात्र पाटस च्या भागवत वाडी परिसरात नव्याने कोरोना बाधीत सापडल्याने पुन्हा पाटस करांची चिंता वाढली आहे.










