दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटसमध्ये दोन प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दौंड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वतः हून होम क्वारंटाईन झाल्या आहेत.
पाटस येथील दोन डॉक्टर पती आणि पत्नीचा कोरोना अहवाल आज पाँझिटिव्ह आला आहे, ज्या रूग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली त्या रूग्णालयातच सभापती यांचे मेडीकल दुकान आहे. यामुळे दक्षता व खबरदारी म्हणून विद्यमान सभापती यांनी स्वतःला होम क्वारटाईन करून घेतले आहे. दरम्यान या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे.










