
दोन्ही मुली भांडुप येथील रहिवासी
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील आमराई नंतर आज मोढवे येथे दोन मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. ही दोन्ही मुले भांडुप येथून आजोबांच्या घरी आले होते. आईला कोरोनाची बाधा झाल्यामुळे या मुलांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये हे दोघेही कोरणा बाधित निघाले.
काल आमराई येथे 29 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्यानंतर कोरोनामुक्त बारामती पुन्हा चर्चेत आली. काल मोढवे येथील दोन मुलींचा घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला. यामध्ये सात वर्षीय व 18 वर्षीय मुली कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. या दोन्ही मुली त्यांच्या आजोबांकडे सुट्टीसाठी आल्या होत्या, परंतु 14 जून रोजी त्या येथे आल्यानंतर 19 जून रोजी त्यांची आई भांडुप येथे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्याची माहिती मिळाल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून बारामती तालुका आरोग्य प्रशासनाने त्यांच्या दोन्ही मुलींची कोरोनाची चाचणी घेतली. त्याचा अहवाल आला. त्यामध्ये या दोन्ही मुली कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान या मुलींना कोणताही त्रास नाही, थोडीशी सर्दीची लक्षणे दिसत आहेत असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.
या दोन्ही मुलींवर रूई येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील आजी-आजोबांसह मामा व इतर नातेवाईकांची कोरोनाची उद्या तपासणी केली जाणार आहे.












News
Very nice ????????????