अवैध व्यवसायिकांचे थेट पोलीसांनाच आव्हान; राजकीय वरदहस्ताबद्दल नागरीकांमध्ये नाराजी
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड – दौंड पोलीसांनी काही दिवसांपुर्वी कुरकुंभ येथील मटका अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह मटकाचालकास ताब्यात घेऊन कारवाई केली होती. मात्र अवघ्या तीन ते चारच दिवसात या व्यवसायिकांचा त्याच ठिकाणी मटका व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे. या व्यवसायिकांना दौंड शहरासह कुरकुंभमधील काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने या व्यवसायिकांची मुजोरी वाढली आहे.
दरम्यान, दौंड पोलीसांनी कुरकुंभ परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर ठोस कारवाई करून त्यांना जरब बसवावी, जेणेकरून पुन्हा हा धंदा करायला ते धजणार नाहीत अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी व्यक्त तेली आहे.
मागील अनेक काही दिवसांपासून कुरकुंभ, औद्योगीक वसाहत परिसरामध्ये बेकायदा गावठी दारू, मटका, गुटखा अशा अवैध व्यवसायांनी उच्छांद मांडला आहे. मटका तसेच गावठी दारू असे अवैध व्यवसाय लोकवस्तीत आणि चौकात खुलेआम सुरू आहेत. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांना या व्यवसायिकांचा आणि या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस पथक पाठवून 5 ऑगस्ट रोजी कुरकुंभ हद्दीत पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूर बाजूचे सव्हींस रोडलगत मटका अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली होती.
दौंड पोलीसांच्या कारवाईनंतर हे व्यवसाय बंद होतील अशी अपेक्षा ग्रामस्थांची होती. मात्र पोलीसांच्या या कारवाईनंतर अवघ्या चारच दिवसात त्याच ठिकाणी हा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झालाच, याशिवाय या ठिकाणासह आणखी दोन ठिकाणी हा व्यवसाय सुरू झाला आहे. या व्यवसाय चालकांना दौंड शहरातील आणि कुरकुंभ येथील काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
तर काही राजकीय पुढाऱ्यांची या व्यवसायात भागीदारी असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच हे व्यवसायिक पोलीसांच्या कारवाईला ही जुमानत नाहीत,