नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर यांच्यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.
या घटनेमध्ये माध्यमिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर, शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले व राजेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दसपुते या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
यामध्ये तक्रारदाराच्या संस्थेच्या शाळेला मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्यासाठी कार्यादेश काढून देण्याचा विषय होता. यामध्ये नऊ लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तडजोड होऊन शेवटी आठ लाख रुपये ठरले आणि त्याचा व्यवहार शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले त्याच्या समवेत करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार येवले याने आठ लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली होती. त्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकारी पल्लवी ढगे पाटील, पोलीस निरीक्षक श्री मते, पोलीस हवालदार श्री मोरे, अश्विनी राजपूत, पोलीस नाईक लोटेकर, शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.











