इंदापूर तालुक्यात शेटफळ हवेली, वडापुरी येथे डाळिंबाची चोरी; तर शेलार पट्टा येथे माशाच्या तळ्यात टाकले विष!
शेटफळ हवेली तीन लाख रुपयांचे दर्जेदार डाळिंब एका रात्रीत चोरी; वडापुरी येथेही डाळिंब चोरी…
मालक आदल्या दिवशी गावाला गेल्याचे पाहून शेटफळ मध्ये चोरट्यांनी साधला डाव … दुष्काळ आणि कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढे चोरट्यांचेही आव्हान
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतील तोडणीला आलेले सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे दोन टन दर्जेदार प्रतीचे डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर वडापूरी येथेही डाळिंब बागेचे तारेचे कंपाउंड चे नुकसान करत चोरांनी डाळिंबाची चोरी केली.
आता ही डाळिंबाची चोरी झाली, पण मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेततळ्यामध्ये विष टाकून पाच टन मासे अज्ञात लोकांनी मारले आहेत. ही घटना शेलार पट्टा भागात घडली. या संदर्भात केवटे या शेतकऱ्याने इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर दुष्काळ आणि कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढे आता चोरट्यांचेही आव्हान उभे ठाकले आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील हरिभाऊ रामचंद्र पुंडे यांच्या डाळिंबाच्या बागेत ही चोरी झाली असून या प्रकाराने पुंडे यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
शेटफळ हवेली येथील हरिभाऊ रामचंद्र पुंडे हे आदल्या दिवशी गावाला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डाव साधला. तर वडापूरी येथील मोनाली शहाजी काळे यांच्या डाळिंब बागेचे तारेचे कंपाउंडचे नुकसान करत चोरट्यांनी डाळिंबाची चोरी केली.
दर्जेदार डाळिंब चोरीला गेल्याची ही धक्कादायक घटना 7 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली असून, 50 गुंठे क्षेत्रातील एकूण झाडांपैकी जवळपास 450 झाडांना जवळपास 400, 450, 500 ग्रॅम वजनाचे हे डाळिंब होते. याबाबत हरिभाऊ पुंडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या अनपेक्षित चोरीमुळे दुष्काळ आणि लॉकडाऊनमुळे आधीच कर्जात बुडालेल्या पुंडे कुटुंबिय हवालदिल झाले आहे.
हरिभाऊ पुंडे यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंबाच्या विक्रीतून त्यांना अंदाजे अडीच लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. या रकमेतून मागील दोन-तीन वर्षांच्या काळातील दुष्काळाचा खड्डा भरून सर्व समस्या सुटतील असे वाटत असतानाच चोरट्यांनी नेमके बागेच्या मधोमध असलेल्या झाडांची दर्जेदार डाळिंब चोरल्याने पुंडे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
अपार कष्ट, बेमाप खर्च, दुष्काळ, तेल्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढउताराच्या जुगाराने त्रस्त इंदापूर तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा तोडून टाकल्या आहेत. त्यातच आता डाळिंब चोरांपासून बागांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हानही शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने 5 टन माशांचा मृत्यू, इंदापूर तालुक्यातील प्रकार
इंदापूरः जनसत्ता लाईव्ह
अज्ञात व्यक्तीने शेलारपट्टा (ता. इंदापूर) परिसरातील शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने 5 टन माशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतक-याचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि. 9) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यात अनेक शेतक-यांनी शेतीला पाणी देण्यासाठी शेततळी तयार केली आहेत. या शेततळ्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यबीज सोडून मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. मात्र परिसरात असे प्रकार वांरवार होत असल्याने शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने 5 टन माशांचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत शेलारपट्टा (ता. इंदापूर) परिसरातील शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने 5 टन माशांचा मृत्यू झाला. त्यात अशोक केवटे या शेतक-याचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि. 9) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
शेवटी यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून या शेततळ्यात त्यांनी आठ महिन्यांपूर्वी रूपचंद नावाचा मासा सोडला होता आता यात 30 हजार माशांचे वजन जवळपास पावशेर ते पाऊण किलो एवढे झाले होते. मात्र रविवारी अचानक रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्यामध्ये विषारी औषध टाकल्याने सर्वच माशांचा मृत्यू झाला.











