पुणे: महान्यूज लाईव्ह
कार्ला येथील आत्म संतुलन व्हिलेज चे प्रमुख आणि आयुर्वेदिक तज्ञ बालाजी तांबे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
लोणावळ्याजवळील कार्ला येथे त्यांनी आत्म संतुलन व्हिलेज उभे केले होते. त्यांनी आयुर्वेदाबद्दल आयुष्यभर जनजागृती केली. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी त्याचा प्रसार केला.
तांबे यांच्या पाठीमागे पत्नी विणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील व्यक्त केला आहे आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात डॉक्टर बालाजी तांबे यांनी बदल घडवला. आहार, विहार आणि विचार यांचा संदेश यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने दिला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.











