खंडाळा : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलीसांनी गेल्या आठ दिवसात अवैध धंद्यावर कारवाईची खास मोहीम राबवली. तब्बल 15 ठिकाणी दारू धंद्यावर धाडी टाकल्या. 23 ठिकाणी छापे टाकून ते 23 गुन्हे दाखल केले. गेल्या सात महिन्यात पोलिसांनी तब्बल 112 छापे टाकून पाच लाख 12 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
उंब्रज पोलिसांनी 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान केलेल्या छापेमारी सहाय्यक निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार केली आणि अवैध धंद्यांवर छापेमारीचे सत्र सुरू केले.
यामध्ये उंब्रज येथील विकास जयवंत चव्हाण, दिगंबर संपत चव्हाण, पाल येथील अमोल सर्जेराव सोनवले, चरेगाव येथील राजू बबन सोनवले, पेरले येथील शौकत मुबारक मुलाणी, मसुगडेवाडी येथील नवनाथ बबन पवार, नडशी येथील हनुमंत प्रल्हाद थोरात, जाळगेवाडी येथील सुहास शंकर भिंताडे, चरेगाव येथील दिपक आनंदराव माने, चाफळ येथील रवी श्रीरंग काटे, शहापूर येथील प्रसाद गजानन खेडेकर, कोंडावळे येथील राहुल सोन्याबापु सोनवले आधी अवैध धंदे व्यवसायिकांनी विरोधात कारवाई केली त्यांच्याविरोधात 15 गुन्हे दाखल केले व 59 हजार 336 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या विरोधात देखील कारवाई केली. आठ ठिकाणी छापे टाकून संभाजी बाबुराव सूर्यवंशी, अनिल आनंदराव सूर्यवंशी, मानसिंग मारुती सूर्यवंशी, भगवान मधुकर काळे, जनार्दन बाबुराव सूर्यवंशी, संजय शिवराम सूर्यवंशी ( सर्वजण रा. पेरले तालुका उंब्रज),
भगवान खाशाबा पाचपुते, (रा. मसूर), दादासाहेब बळवंत जाधव, भानुदास लक्ष्मण जाधव, गजानन बाळकृष्ण जाधव, दादासाहेब निळकंठ पवार, हनुमंत नारायण जाधव, नारायण शंकर जाधव, नवनाथ युवराज जाधव, संजय गणपत शिरसागर, राजेंद्र रामचंद्र जाधव (सर्व राहणार तारळे),
तानाजी किसन संकपाळ, सुरेश तात्याबा सकपाळ, शंकर ज्ञानू सकपाळ, सर्जेराव रामचंद्र सकपाळ, विठ्ठल तुकाराम सपकाळ (सर्व रा. वरची केळवली), सदाशिव जिजाबाई भोसले, दादासाहेब बाबू भोसले, मोसिन मुबारक मोमीन, सुनील बापू शेलार सर्व राहणार कोण जावळे सिकंदर वजीर डांगे (रा. तळेगाव ता. कराड),
बाबासाहेब धोंडीराम गोसावी (राहणार चरेगाव), बबन बाळू मोरे, संभाजी बबन माळी, विक्रम बळीराम लोहार, संदीप रामचंद्र भादर्गे, महादेव रामचंद्र खरात, नितीन भिमराव सरगडे, वाहिद इसाक मोमिन, दीपक अशोक नागे (सर्व रा. तारळे तालुका पाटण) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली त्यांच्याकडून 59 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, फौजदार अनिल पाटील, फौजदार श्री तलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर, तारळे, चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस अंमलदारांनी केली. दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध दारूची विक्री करताना कोणी आढळल्यास त्याची माहिती 96 23 96 1000 या क्रमांकावर द्यावी असे आवाहन अजय गोरड यांनी केले आहे.











