दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : शहरासह तालुक्यातील गावांमध्ये दिवसेंदिवस कोरोना नियमांचे ऊल्लंघन करुन नागरीक विनामास्क, समांतर अंतर न ठेवता ड्रिपलसीट फिरणे, वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे असे वर्तन करतात. या बेजबाबदारांना लगाम घालण्या साठी आज (दि.६ रोजी) वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, फौजदार राजेंद्र कदम यांनी दंडात्मक कारवाई केली आणि वाहनचालकांची पळता भुई थोडी झाली.
नियमीत वर्दळ असणाऱ्या भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीसांचा फौज फाटा घेऊन अचानकपणे दंडात्मक सुरु झालेल्या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली. या वेळी अनेक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली .
सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवडाभरापासून वाई शहरासह तालुक्यातील गावांमध्ये
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनोचे हे थैमान रोखण्यासाठी प्रशासनाने नागरीकांना मास्क लावून वाहणे चालवणे, समांतर अंतर ठेवणे, ड्रिपलसीट वाहने न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे अशा अटी घालून दिल्या.
मात्र असे असताना तरुण आणि नागरीक या नियमाचे ऊल्लंघन करुन विनामास्क आणि ड्रिपलसीट फिरत आहेत. आजच्या या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली.
वाई पोलिस ठाण्यात मनुष्यबळाची संख्या कमी आहे. परंतु आनंदराव खोबरे हे व सर्व पोलिस कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन कारवाई करत आहेत. अशी कारवाई करत
असताना काही महिला आणि पुरुष पोलिस
कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटीव्ह
निघाले, तर एका पोलिस कर्मचाऱ्याला
आपला प्राण गमवावा लागला.
पण दुर्दैवाने वाई शहरासह तालुक्यातील नागरीकांमध्ये रोगाची कसलीच भीती वाटत नसल्याने बेफिकीर वृत्ती वाढत आहे, तरुणांचे यात बळी जात आहेत याचे भान ठेवणे अपेक्षित असल्याचे पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आजच्या कारवाईत खोबरे, फौजदार कदम, क्षमा माने, सुजाता मोकाशी, सोनाली माने, ज्ञानेश्वरी भोसले, मुकुंद माळी, धीरज नेवसे, हणमंत दडस,
बापुराव मदने यांनी सहभाग घेतला.











