इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एमआयडीसीमधील वाय एक्सेस कंपनीमध्ये काम करताना अंगावर लोखंडी जॉब पडून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून. यामध्ये सुरेश प्रसाद यादव (वय ५० वर्ष, मूळ राहणार हा हत्तारपुर जिल्हा मोतिहारी, बिहार, सध्या रा. लोणी देवकर, एमआयडीसी तालुका इंदापूर) असे या मयत कामगाराचे नाव आहे. यासंदर्भात किरण बाबुराव भिसे राहणार पळसदेव यांनी पोलिसांकडे खबर दिली ही घटना १ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ च्या आसपास घडली
सुरेश यादव हे काम करत असताना त्यांच्या अंगावर लोखंडी जॉब पडून ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे आणले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी इंदापूर पोलीस पुढील तपास करत असून, पोलीस नाईक भोंगळे पुढील तपास करत आहेत.











