सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : एखादं वाहन बंद असेल तर त्यात काहीही घुसू शकते.. मात्र इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील एका दुचाकीच्या खोपडीमध्ये चक्क एक नाग शिरला. नशीब चांगले म्हणून वेळीच साप शिरल्याचे लक्षात आले आणि आणखी एक सुदेव म्हणजे स्वतः दुचाकीचालक सर्पमित्र असल्याने गॅरेजमध्ये नेऊन स्वतःच हा साप बाहेर काढला तो चक्क नाग निघाला..!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
निमगाव केतकी (ता इंदापूर )येथील प्रा.सोपान तात्याराम भोंग यांच्या दुचाकीच्या खोपडीत हा नाग शिरला होता. दोन ऑगस्ट रोजी सोमवारी ही घटना घडली.
प्रा. भोंग हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे दुचाकीवरून शेतात गेले होते. शेतातील कामे केल्यानंतर गाडीला हात लावताच गाडीतून फुस्स असा आवाज येऊ लागला. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी थोडे पाहिले तेव्हा गाडीच्या खोपडीत सापासारखे काहीतरी दिसले. त्यांनी तिथेच त्याला काढण्याचा प्रयत्न केला मात्र साप आत मधे शिरता शिरता खोपडी मध्ये अडकल्याने त्याला बाहेर पडता येईना.
अखेर भोंग यांनी दुचाकी चालवत निमगाव केतकी गावात आणली गावातील गॅरेजमध्ये आणली गॅरेजमधील मेकॅनिकने खोपडी खोलल्यानंतर स्वतः भोंग यांनीच हळुहळु त्यास इजा न होता बाहेर काढले असता तो पाच फुट लांबीचा इंडियन कोब्रा जातीचा नाग निघाला.
भोंग यांनी त्यास वनीकरणात सोडुन दिले.
पावसाळ्यात साप हे गाडीच्या खोपडीत, मटगार्ड, प्यानल बॉक्समध्ये शिरतात त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहन सर्पमिञ भोंग यांनी केले आहे










