पुणे : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून काहीही चोऱ्या होऊ लागल्या आहेत, मात्र आतापर्यंत या चोऱ्या दुकानातील, शेतमालातील, घरातील होत होत्या, तोपर्यंत ठीक होतं! मात्र दोन दिवसावर आखाड आला आहे म्हणून चक्क कोंबड्या चोराव्यात का? पुण्यातील हडपसर येथील २० कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार कोंबडी मालकाने दिली आहे.
पुण्यात काहीही घडू शकतं असं जे म्हणतात ते काहीच खोटं नाही, अशा प्रकारचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हडपसर येथील हिंगणे मळानजीक हाजी चिकन शॉप मधील वीस गावरान कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार कोंबडी मालकाने दिली आहे. दरम्यान या दुकाना शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून येऊन पोत्यामध्ये कोंबड्या भरून गेल्याची दृश्य दिसत आहेत.
आता या कोंबड्यांची किंमत किती? तर मालकांनी दिलेल्या तक्रारीत या कोंबड्याची किंमत पाचशे रुपये नमूद केली आहे. दरम्यान स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पाचशे रुपयांसाठी दुचाकीवरून येऊन चोऱ्या करणे म्हणजे अफलातूनच आहे चोरी करून करून काय केली? तर ५०० रुपयांच्या कोंबड्या चोरल्या.











