अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुणे : शहरातून वाहणारा खडकवासला कालवा फुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. वानवडी येथील जांभूळकर मळा येथे या कालव्याची संरक्षक भिंत ही पाण्याचा विसर्ग जसा वाढेल,तशी संरक्षण भिंत ढासळत आहे.
याआधीही या भागातील भरावाची पडझड झाली होती. यापूर्वी एकदा कालवा फुटलाही होता, परंतु जिथे फुटला होता तिथे ओढा असल्याने ते पाणी त्याद्वारे वाहून गेले होते.
जांभूळकर मळा या भागात सुमारे अडीच ते तीन हजाराची लोकवस्ती आहे. संरक्षण भिंत पूर्णपणे ढासळली, तर या भागात खूप मोठी जीवित आणि वित्त हानी होऊ शकते, त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने ही दुरुस्ती करावी अशी विनंती या भागातील नागरिक करत आहेत.











