महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
यावर्षी पावसाळ्यात सर्वाधिक दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्याचा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला. पण महाराष्ट्राच्या जोडीनेच तिकडे हिमाचल प्रदेश मध्ये देखील थरकाप उडवणाऱ्या घटना घडत आहेत. हिमाचल प्रदेशातील शिरमोर जिल्ह्यातील नाहन भागात अशा पद्धतीने डोंगर खाली कोसळला आहे की, ज्यामध्ये एका क्षणात संपूर्ण रस्ता नाहीसा झाला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
काँग्रेस नेते बी.व्ही. श्रीनिवास यांच्या ट्विटनंतर यातील थरकाप उडवणारी घटना पुढे आली असून 707 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. या संदर्भात एएनआयने देखील माहिती दिली असून या घटनेत संपूर्ण डोंगर खाली कोसळला आहे. महाराष्ट्रामध्ये तळीये, आंबेघर, देवरुखवाडी आदी गावांमध्ये दरडी कोसळून अनेकांचा जीव गेला. पुरात तसेच मातीच्या लोंढ्यात काही जण वाहून गेले. तसाच काहीसा प्रकार हिमाचल प्रदेश मध्ये दिसून येत आहे.
हिमाचल प्रदेश मधील भागात बदवास या डोंगररांगेच्या परिसरामध्ये घाटरस्ता संपूर्ण कोसळला आहे आणि तो अवघ्या काही क्षणात कोसळला आहे. त्याची थरकाप उडवणारी ही दृश्य पाहिली की, भीती शिवाय पर्याय राहत नाही.











