दिल्ली : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने, पहिल्या लाटेच्या दरम्यान सरकारने जी तत्परता दाखवली नाही. ती मात्र आता दाखवली आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर सरकारने बंदी घातली असून, कोणतेही विमान भारतात अथवा भारताबाहेर जाणार येणार नाही.
भारतामधील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, मात्र तोपर्यंतच भारत तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. अशातच केंद्रीय विमानपत्तन प्राधिकरणाने भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी जाहीर केली आहे. डेल्टा व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, कार्गो उड्डाण वगळता इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जगातील इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरीएंटचे विषाणू आढळून आल्याने तत्परता म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.











