• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांचा उपक्रम; पुढील एक महिना आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार घरपोच…!

Maha News Live by Maha News Live
July 22, 2021
in यशोगाथा, महिला विश्व, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या सृजनशील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि बारामती अॅग्रो लिमिटेडच्या माध्यमातून मोबाईल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी, २२ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजता शासकीय महिला रुग्णालय बारामती येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत आपले कर्तव्य बजावत आहे. रुग्णांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र तत्पर आहे. मात्र कोरोनाला आळा घालताना इतर आजार असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना योग्यवेळी आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि बारामती अॅग्रो लिमिटेडच्या माध्यमातून बारामतीकरांसाठी मोबाईल क्लिनिक व्हॅन(फिरता दवाखाना) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोविड पूर्व काळात आ. रोहित पवार यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत होते, नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळून २०१७ पासुन सुमारे ५८ हजार ८० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, यामध्ये ७ हजार ८०१ रुग्णांवर उपचार पुर्ण करण्यात आले असून ५७४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली गेली.

सध्याच्या कोरोना महामारीमुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र येण्यावर मर्यादा आहेत. लोकांना आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, त्यांना वाहतुकीच्या साधनांच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागू नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी थेट नागरिकांच्या दारात मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे. फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, औषधे(सामान्य आजार), मधुमेह व रक्तदाब(बी.पी.) तपासणी या सुविधा दिल्या जाणार आहेत.

२२ जुलैपासून पुढील एक महिना बारामतीतील सर्व सामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असून सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी केले आहे.

मोबाईल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी सभापती निताताई फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महिला शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे आणि डॉ. बापू भोई यांच्यासह पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Ajitdada PawarBaramatikarjat jamkhedrohit pawar
Next Post

यवत हद्दीत वाढत्या चोरी रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविणार; पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group