अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह
पुणे : उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुहास चाकणकर यांच्या पुढाकारातून धायरी येथे नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
१२ वी पास ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी येथे नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे चाकणकर यांनी यावेळी सांगितले. सर्व युवा वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा व आपले भविष्य समृद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याचे उद्घाटन खडकवासला मतदार संघाचे शहराध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रूपालीताई चाकणकर, माजी नगरसेवक बाळासाहेब रायकर, माजी सरपंच सुरेश पोकळे, पुणे शहर उपाध्यक्ष सुनीता डांगे, खडकवासला मतदार संघाच्या अध्यक्षा भावना पाटील, सिंहगड इंडस्ट्रीअल असोसिएशनच्या अध्यक्ष पल्लवी जाधव, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, प्रभाग ३३ च्या अध्यक्षा राजश्री खिल्लारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि रोजगार मेळाव्यास आलेले तरुण-तरुणी उपस्थित होते.











