दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळांना दूरदर्शन संच तर १३ शाळांना संगणक प्रदान करण्यात आले. पंचायत समितीच्या प्रांगणात सभापती सौ.संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्या हस्ते मुख्याध्यापकांना साहित्य देण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेच्या उपकरातून (सेसफंड) हे संच उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी सांगितले. दरेवाडी, भुईंज(क्र.२), मांढरदेव,बोरगाव बु., कदमवाडी, अनवडी, पिराचवाडी, पाकिरेवस्ती, बोरगाव खु. विठ्ठलवाडी, मांढरेवाडी (चिखली), वारागडेवाडी व दत्तवाडी येथील शाळांना संगणक देण्यात आले.
वरखडवाडी, आसले, पाराटवस्ती, जांभळी, वासोळे, वळकुंदेवाडी, तुपेवाडी, मोहडेकरवाडी, मुंगसेवाडी, देवरुखवाडी, अनपटवाडी, ओहळी, बटवाडी, पालाना, किरोंडे, दत्तनगर, भिवडी, वडाचीवाडी व शिरगाव या शाळांना स्मार्ट टीव्ही संच देण्यात आले.
शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, मनीषा गाढवे, आनंद चिरगुटे, अॅड. दामिनी चव्हाण, हणमंत पवार, शेखर जाधव, सुरेखा शिंदे, वर्षा काळे, रामदास गायकवाड, प्रशांत पवार, दीपक येवले आदी उपस्थित होते.











