• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस येथील दुहेरी हत्याकांडाचा निकाल हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मोर्चातून मागणी

Maha News Live by Maha News Live
July 15, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

जयमल्हार क्रांती संघटनेची मागणी, दौंड तहसील कार्यालयासमोर निषेध सभा

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांची निघृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सुनावणी हा जलदगती न्यायालयात व्हावी, या हत्येकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या घटनेत सहभागी असलेल्या उर्वरीत आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली.

दरम्यान, यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.
पाटस येथील शिवम संतोष शितकल आणि गणेश रमेश माकर या दोन तरूणांची 4 जुलै रोजी क्रुर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून आणि उर्वरीत आरोपींना अटक करावी यासह विविध मागण्यासांठी हा मोर्चा आज ( दि.15) दौंड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

तहसील कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करता दौलत शितोळे म्हणाले की, राज्यात रामोशी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. पाटस येथील दोन निष्पाप तरूणांची क्रूर हत्या केली. ही अंत्यत भयानक आणि दुर्देवी घटना आहे. आमचा वारसा हा आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक आणि बहिर्जी नाईक या क्रांतीकारकांचा आहे. आमचा पोलीसांवर आणि कायद्यावर विश्वास आहे. पोलीस योग्य पध्दतीने तपास करतील अशी आमची खात्री आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस या घटनेतील आरोपींना मोकळे सोडणार नाहीत. चार आरोपी बारा तासाच्या आत पकडले आहेत. मात्र, उर्वरीत आरोपींनाही अटक करावी, तसेच हा गुन्ह्याची सुनावणी हा फास्टटॅग कोर्टात जलदगतीने करावी, या हत्याकांडातील आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, रामोशी समाजावरील अन्यायाच्या घटना लक्षात घेवून त्यांना अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शितोळे यांनी केली.

यावेळी पुणे जिल्हाचे अध्यक्ष नानासाहेब मदने म्हणाले की, यापुढे रामोशी समाजावरचा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, अशा घटना घडल्या तर जशाच तसे उत्तर देवू, मात्र अशा घटना घडू नये याची जबाबदारी पोलीस प्रशासनांची आहे.

वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे म्हणाले की, ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पडतो. पोलीस प्रशासनाने या घटनेतील तपासात हलगर्जीपणा करू नये,. राजकीय दबावाला बळी पडून आरोपींना मदत करू नये.

अनिल माकर यांनी सांगितले की, भर लोकवस्तीत आणि मंदीरासमोर ही हत्या करण्यात आली ही गंभीर बाब आहे. या घटनेतील या हत्येचा सुत्रधार शोधून सर्व आरोपींना अटक करावे, आम्ही त्यांच्या तपासात हस्तक्षेप केला नाही. आरोपी का पकडले नाहीत याचा जाबही विचारला नाही, आम्ही कायदा मानतो.

जयमल्हार क्रांती संघटनेच्या महिलाअध्यक्षा सुजाता जाधव, महाराष्ट्र वडार संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, तृप्ती भंडलकर, रामदास खोमणे आदींने मनोगत व्यक्त केली. दरम्यान, यावेळी संघटनेच्या पदाधिकारांनी तहसीलदार संजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदार संजय पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांना हे निवदेन पाठवून मागण्यांसंदर्भात चर्चा करून न्याय मिळण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

दौंड तालुक्यासह बारामती, फलटण, सातारा, शिरूर, इंदापुर, कोल्हापुर आदी भागातून अनेक पदाधिकारी आणि कार्येकर्ते सहभागी झाले होते. घटनेचे गांर्भाय लक्षात घेवून दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. पाटस येथे सकाळ पासूनच पोलीसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता.

Next Post

मटणाच्या पार्टीत झाला किरकोळ वाद आणि दारूच्या नशेत मित्राचा खून करून तो थेट नेपाळमध्ये गेला..पण पुणे पोलिसांचे हात भी 'बडे लंबे थे'.! नेपाळ मधून सासवड पोलिसांनी आरोपी आणला..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group