महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
घराची पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उजेड हवा म्हणून विजेचा बल्ब सोडला आणि त्यात विजेचा करंट पोहोचून एकाच कुटुंबातील एकमेकांना वाचविण्यासाठी एका पाठोपाठ एक तब्बल सहा जणांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. एक संपूर्ण घर एका क्षणात उध्वस्त झालं ही घटना मध्य प्रदेशातील छतरपुर जिल्ह्यातील बिजावर येथे रविवारी सकाळी घडली.
लक्ष्मण अहिरवार (वय 55), शंकर अहिरवार (वय 35) , मिलन अहिरवार (वय 25), नरेंद्र अहिरवार (वय 20), रामप्रसाद अहिरवार( वय 30) ,विजय अहिरवार (वय 20) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेशात खळबळ उडाली.
बिजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील महुआ-झाला येथील लक्ष्मण अहिरवार यांच्या घरात ही घटना घडली. रविवार असल्याने घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला होता. त्यामध्ये ही पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला कुटुंबातील एक जण खाली उतरला. मात्र टाकीत अंधार होता.
त्यामुळे उजेड करण्यासाठी बल्बची व्यवस्था करण्यात आली. मात्र या बल्बमधील वायर्स मधून ओल्या टाकीमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि पहिल्यांदा टाकीमध्ये उतरलेल्या अहिरवार कुटुंबातील एकाला शॉक बसला. तो जोरात ओरडल्याने त्याच्या मदतीसाठी एकापाठोपाठ एक असे पाच जण टाकीत उतरले आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र उपचारापूर्वीच या सहा जणांचा मृत्यू झाला होता.
घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी एकजण खाली उतरला होता. पण टाकीत अंधार असल्याने उजेड पाडण्यासाठी वीजेची व्यवस्था केली होती. त्यावेळी टाकीत उतरलेल्या एकाला वीजेचा शॉक लागल्याने तो ओरडला. त्याचा आवाज एकून घरातील दुसरा एक सदस्यदेखील टाकीत उतरला. यानंतर एक-एक करून 5 जण टाकीत उतरले. पण एकाचा वाचविण्याचा प्रयत्नात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी या सहा जणांना मृत घोषित केले आहे.











