विशाल कदम:-महान्यूज लाईव्ह
मुंबई : बक्षीस दिले नाही याचा राग मनात घरून तृतीयपंथी ने एका तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार कफ परेड (मुंबई)येथील आंबेडकर नगर परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तृतीयपंथी व त्याच्या सहकारी पुरुष मित्रास कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बक्षीस मागण्यासाठी तृतीयपंथी सदर मुलीच्या पालकांकडे एक साडी, एक नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी त्यानं पालकांकडे केली. कोरोनामुळे सद्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मुलीचे पालकांनी ही मागणी पूर्ण करु शकले नाहीत. बक्षीस दिले नाही याचा राग मनात धरून तृतीयपंथी तिथून निघून गेला.
तृतीयपंथीने मध्यरात्री २ ते ३ सुमारास या तृतीयपंथीयाने आपल्या पुरुष मित्रासह येऊन मुलीचं अपहरण केलं. अपहरण करुन त्या मुलीला कप परेड इथल्या आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरल. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींनी अटक केली आहे. तरी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सदर घटनेमुळे पोलीस स्थानकासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते की, हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला, परंतु पोलिसांनी नरबळीची शक्यता नाकारली आहे.











