पुणे : महान्यूज लाईव्ह
कोथरूडमध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोमनाथ नामदेव धारुळे (वय २४ , रा. गल्ली नंबर -३ बिराजदार नगर हडपसर पुणे) असे या दरोडेखोराचे नाव आहे.
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे 1 जुलै रोजी हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक काम करत होते.
हडपसर स्टेशन , पुणे यांची दोन पथके तयार करुन हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंध करीत असताना पोलीस नाईक समीर पांडुळे व पोलीस शिपाई शाहिद शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , हिंगणेमळा रोडने बिराजदारनगर हडपसर पुणे . येथे आमचे ओळखीचा व रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सोमनाथ नामदेव धारुळे (वय २४ , रा. गल्ली नंबर -३ बिराजदार नगर हडपसर पुणे) हा चोरी करून हिरो होन्डा कंपनीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलवरुन फिरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने या ठिकाणी पथकाने चौकशी केली असता धारुळे हा त्याचेकडील हिरो होन्डा सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलवरुन फिरत असताना दिसला होता. त्याचा पाठलाग करुन पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. यावरून हडपसर पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूळे याला सदर गुन्हयात अटक करुन त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.











