दौंड : महान्यूज लाईव्ह
भाजपने काल केंद्रीयमंत्री पदाची शपथ देऊन मंत्री झालेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात आज दौंड युवासेनेने आंदोलन केले. या आंदोलनात नितेश राणे हे भाजपचा कुत्रा असल्याचा फलक एका कुत्राच्या गळ्यात टाकून हि टिका केली आहे.
नितेश राणे यांनी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दौंड युवासेना जोरदार आक्रमक झाली. आज गुरूवारी ( दि.8) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे नितेश राणे यांचा युवासेना आणि शिवसेनेच्या कार्यकत्यांनी आंदोलन केले.
नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत एका कुत्र्याच्या गळ्यात नितेश राणे यांच्या नावाच्या पाटी अडकवण्यात आली. या पाटीवर राणे यांचा निषेध करीत ते भाजपचा कुत्रा असल्याचे लिहीले होते. राज्यात सध्या गलिच्छ राजकारण केले जात असून वेळोवेळी राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहे असा आरोप यावेळी युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.
शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवासेनेचे निलेश मेमाणे, समीर भोईटे, निरंजन ढमाले, राहुल फडके, अभिजित शेलार, विकास रणदिवे, फैझ सय्यद आदींनी हे आंदोलन केले.











