इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पळसदेव येथील 14 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला आहे. पळसदेव येथे आईला भेटण्यासाठी आलेल्या व येथील नागरिकांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास पुण्यात परतल्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व संपर्कातील 14 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल तीन दिवसांपासून प्रलंबित होते. पोंदकुलवाडी येथील कोरोना संशयितांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आता पळसदेव मधील कोरोना संशयितांबाबत काय अहवाल येतो याची उत्सुकता इंदापूर तालुक्यातील सर्वांनाच होती. रात्री उशिरा हे सर्व अहवाल आले. इंदापूर तालुक्यात चार ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांव्यतिरिक्त कोरोनाग्रस्त नसल्याने इंदापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे.










