बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील कार्व्हर एव्हिएशन या संस्थेमध्ये पायलट ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थिनीशी विनयभंग केल्याबद्दल या संस्थेतील प्रशिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात विद्यार्थिनीच्या पालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. बारामती येथे विमान पायलट प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या कार्व्हर एव्हिएशन या संस्थेमध्ये संबंधित विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत होती. या प्रशिक्षणादरम्यान प्रमुख पायलट प्रशिक्षक विवेक अग्रवाल याने गैरवर्तन केले व त्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी जिल्हा पोलिसांकडे दिली होती. इयत्ता 2 फेब्रुवारी दरम्यान घडली. यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी विमान चालवत असताना चीफ पायलट अगरवाल यांनी तिच्याशी दोन-तीन दिवस गैरवर्तन केले अशी तक्रार संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दौंडच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना यामध्ये चौकशी करण्याची सूचना केली होती त्यानुसार पोलिसांनी अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला.










