पळसदेव करांसह इतरांनाही दिलासा
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील पळसदेव गावातील एका कोरोना पोलीस कर्मचाऱ्या संपर्कात आल्याच्या संशयावरून बारा जणांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी आठ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 15 मे रोजी दोन दिवसाची सुट्टी काढून आपल्या मूळ गावी पळसदेव येथे आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास पुण्यात परतल्यानंतर अचानक त्रास सुरू झाला, त्याची चाचणी केली असता त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल आज सकाळी आला. त्यापैकी चार जणांच्या अहवालामुळे चिंतेत असलेल्या पळसदेवकरांचा जीव भांड्यात पडला. अर्थात अजून आठ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.











1no news channel