निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मालकिच्या जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी पापा इनामदार टोळीकडुन 91 लाख रुपयांची खंडनीची मागणी, कोंढव्यातील पापा इनामदार टोळीच्या विरोधात गुन्हा.
विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने, कोंढवा परीसरात सव्वा दोन एकर जागा खरेदी केली होती. मात्र या जागेवर पापा इनामदार टोळीने बेकायदा ताबा मारला. हा ताबा सोडावा यासाठी संबधित निवृत अधिकारी व त्याचे मित्र गेले असता, पापा इनामदार व त्याच्या चार सहकाऱ्यांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी प्रतिगुंठा 1 लाख रुपये असे एकूण 91 लाख रुपयांची खंडणी मागितली.
जमिनीवरील बेकायदा ताबा सोडण्यासाठी, जागामालक असणाऱ्या निवृत्त पोलीस निरीक्षकाकडे तब्बल 91 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या कोंढव्यातील पापा इनामदार टोळीच्या विरोधात पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला.
निवृत्त पोलीस निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, कोंढवा पोलिसांनी पापा इनामदार, रुपचंद भिमाजी गजरे, रफिक इनामदार आणि अय्याज अब्दुल रेहमान शेख व मुसा कमरोद्दीन इनामदार (सर्व. रा. कोंढवा) या पाच जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन, वरील पाच आरोपीपैकी मुसा कमरोद्दीन इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यांने, आपल्या मित्राच्या मदतीने कोंढवा परीसरात कांही वर्षापुर्वी 91 गुंठे जागा खरेदी केली होती. मात्र या जागेवर पापा इनामदार टोळीने बेकायदा ताबा मारला. हा ताबा सोडावा यासाठी संबधित निवृत अधिकारी व त्याचे मित्र गेले असता, पापा इनामदार व त्याचे वरील चार सहकाऱ्यांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी प्रतिगुंठा 1 लाख रुपये असे एकूण 91 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी खंडणी विरोधी पथक करत होते.
दरम्यान खंडणी विरोधी फथकाने केलेल्या चौकशीत तथ्य आढळल्याने, पोलिसांनी पापा इनामदार व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा केला आहे. पापा इनामदारसह फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता…
दरम्यान पापा इनामदार व त्याच्या टोळीने येवलेवाडी भागात जुने व नवीन नकाशे असा घोळ घालून कमी किमतीत अनेक जमिनी बळकावल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीचा पापा इनामदार हा म्होरक्या आहे. आता यात आणखी कोणी आहे का याचा तपास सुरु आहे.
दरम्यान पापा इनामदार व त्याच्या सहकाऱ्यांनी कोणाच्या जमीनी बळकावल्या असतील तर, अशा नागरीकांनी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळूखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली आहे.











