विशाल कदम:-महान्यूज लाईव्ह
पुणे : दाजीनेच मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर बलातकार केल्याची धक्कादायक घटना पुणे येथील रास्ता पेठेतील क्रिश हॉटेल वर घडली. बायकोलाच संशय आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. बलातकार करणाऱ्या नराधमाला समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. २४) हैद्राबाद येथून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
महंमद रुबान महंमद मसूद ( वय २६, रा. हैद्राबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आयेशा (नाव बदलले आहे) ही आईबरोबर मुंब्रा येथे राहते. आयशा ही १८ मे ला राहत्या घरातून मिसिंग झाली होती. आयशाच्या आईने तिचा मुंब्रा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता, परंतु ती आढळून आली नाही.
आयशाच्या आईने हैद्राबाद येथील बहिणीकडे आयशाची चौकशी केली असता, बहिणीचा पती आरोपी याने सांगितले की, मला आयशाचा फोन आला होता. तिने फोनवरून बोलताना सांगितले की, ”मै घर छोडकर आई हू, ”और मरने जा रही हू, असे मला म्हणाली. असल्याचे सांगितले. तेव्हा आयशाच्या आईने तिच्याकडे फोन नाही, तर तिने तुम्हाला फोन कसा केला. असे विचारले असता, आरोपी याने आयशाचा शोध घेऊन तुम्हाला कळवतो. असे म्हणून फोन कट केला.
आरोपी महंमद मसूद हा आयशाला दुसऱ्या दिवशी (१९ मे ) घरी घेऊन आला. आरोपीने सांगितले की आयशा डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ सापडली आहे असे सांगून आरोपी त्याच्या गावी हैद्राबादला निघून गेला. मात्र आरोपीच्या पत्नीला सुमारे पाच दिवसांनी आरोपीच्या पँटच्या खिश्यातून पुण्यातील रास्तापेठ येथील क्रिश हॉटेलची पावती मिळाली. म्हणून आरोपीच्या पत्नीला संशय आल्याने तिने तिच्या भावाला पुण्याला जाऊन खात्री करण्यास पाठविले.
आरोपीच्या मेहुण्याने सदर हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता, आरोपी महंमद मसूद हा त्याच्या पत्नीसोबत मुक्कामी राहिला असल्याचे समजले. परंतु आयेशाच्या नातेवाईकांनी हॉटेलवर जाऊन खात्री केली असता, आरोपी महंमद हा आयेशाला घेऊनच हॉटेलमध्ये राहिला असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, आयेशाच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपी महंमद मसूद याने बलातकर केला असल्याचे सांगितले. तसेच कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे आयेशाने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर दोघींनी मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी महंमद मसूद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घडलेला प्रकार हा पुण्यातील असल्यामुळे मुंब्रा पोलिसांनी गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी समर्थ पोलीस ठाण्यात वर्ग केला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन समर्थ पोलिसांनी आरोपी महंमद मसूद याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पकडण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक ज्योती कुटे, सहाय्यक फौजदार अर्जुन दिवेकर, निलेश साबळे, निलेश किरवे, शांताराम तळपे आणि शुभम देसाई यांनी पथक तयार केले.
आरोपी महंमद मसूद हा हैद्राबाद येथील रहिवासी असल्याची माहिती सदर पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर पथकाने आरोपीच्या घरी जाऊन पाहणी केली असता, आरोपी तेथे आढळून आला नाही. आरोपीच्या फोटोच्या आधारे परिसरात शोध घेत असताना, आरोपी चंद्रयानगुट्टा परिसरात आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी महंमद मसूद सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला २८ जून पर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आरोपीस पकडण्यासाठी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त सागर पाटील, फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.











