बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी बारामती सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री निधीसाठी ११ लाख रुपये दिले आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. या दौऱ्यावेळी बारामती बॅंकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांनी हा निधी उपमुख्यमंत्र्यांकडे सूपूर्त केला. यावेळी उपाध्यक्ष अविनाश लगड, नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांच्यासह बॅंकेचे संचालक उपस्थित होते.










