बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना ची दुसरी लाट जशी वेगाने आली, तशीच ओसरली असे सांगितले जात होते, मात्र गेल्या पाच-सहा दिवसात बारामती आणि इंदापूर तालुक्यात लोकडाऊन च्या नियमात शिथिलता आणल्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. इंदापूर तालुक्यात 6 पर्यंत खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या, काल 62 वर पोहोचली; तर बारामतीत देखील 13 पर्यंत घसरलेली रुग्णसंख्या आज 76 वर पोहोचली आहे.
काल बारामती मध्ये विविध प्रयोग शाळेमध्ये 655 जणांची तपासणी झाली. त्यामध्ये 76 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे 58 रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात तपासण्यांमध्ये 62 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे शहरात फक्त एक तर ग्रामीण भागात 61 रुग्ण आढळून आले आहेत. इंदापूर तालुक्यात रुग्णसंख्या वाढता वाढता 16 हजार 239 वर पोहोचली आहे. इंदापूर तालुक्यातील कोरोना ने मृत्यू झालेल्यांची संख्या 398 वर पोचली आहे. काल इंदापूर तालुक्यात 521 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये 62 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.











