पुणे : महान्यूज लाईव्ह
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडीने कारवाई केली. भोसले यांची चाळीस कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसले यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे ईडीने ट्विट केले आहे. फेमा कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे
भोसले यांची मालमत्ता जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली असून सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे असलेल्या अविनाश भोसले यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून तिकडून चौकशी सुरू होती. या प्रकरणांमध्ये भोसले यांची यापूर्वी दोन वेळा चौकशी झाली होती.
त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी झाली होती फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी व विदेशी चलनाच्या प्रकरणात ही चौकशी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून ईडीकडून पुन्हा नव्याने भोसले यांची चौकशी सुरू झाली होती. आज एलीने त्यांची थेट मालमत्ता जप्त केली. यापूर्वी देखील भोसले यांना ईडीने 1.84 कोटींचा दंड केला होता.











