संदीप मापारी पाटील, बुलढाणा
अखिल भारतीय सत्यसाई सेवा संघटनेकडून बुलढाणा जिल्ह्यात करिता कोरोना च्या पार्श्वभूमीवर ुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
लोणार येथे त्याचा श्री मंगल कार्यालयात लोकार्पण सोहळा झाला, या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून उद्घघाटन करण्यात आले. ‘मानव सेवा हीच माधवसेवा’ या उक्तीप्रमाणे श्री सत्यसाई सेवा संघटनेने ‘ करोना महामारीच्या या काळात गरजू लोकांना मदत केली.
या ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरमुळे गरजू लोकांना मोफत उपचार घेण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा युवा समन्वयक श्री ओमप्रकाश बियाणी यांनी दिली. याप्रसंगी बन्सीलाल बियाणी, गौतम गेलडा, डॉ. राजेश मुदंडा, डॉ. मयूरेश्वर भावसार, डॉ. प्रा. सुरेश मापारी, शंतनू मापारी, चंदन राका, दिपक झोरे, पत्रकार उमेश कुटे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी लोणार समिती प्रमुख कैलासराव इंगळे, किशोर उंबरकर, योगेश भालेराव, सुचित शेटे, महेश पातळे, लोकेश बियाणी यांचे योगदान लाभले.











