• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुभवतात अजितदादांची ‘दादा’..गिरी..!

Maha News Live by Maha News Live
June 11, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

पुणे : महान्यूज लाईव्ह

11 जून 2021.. वेळ : सकाळची.. स्थळ : शिवाजीनगर पोलीस मुख्यालय! नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि काही तरी त्यांना खटकले. कामाची पाहणी करताना त्यांनी थेट, ए कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे रे? असा प्रश्न केला आणि ठेकेदार येताच ठेकेदाराला सुनवायला सुरुवात केली..! काम ट्यूब लेव्हल मध्ये झाले नाही असे पहिल्यांदा सांगत, त्यातील बारीक बारकावे अजितदादांनी ठेकेदाराला सांगण्यास सुरुवात केली आणि अधिकारीदेखील अवाक झाले! आजपर्यंत त्यांनी राजकीय नेते हे मंजूर केलेल्या कामाचे आपल्याच काळात उद्घाटन झाले पाहिजे, यासाठी आग्रही असल्याचे अनेकदा पाहिले आणि फक्त काम तातडीने करण्यासाठी ते पाठपुरावा करतात एवढे माहिती होते.. परंतु अजित पवारांना केवळ काम तातडीने व्हावे, एवढेच नाही तर ते काम दर्जेदार व्हावे असे वाटत असते आणि त्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि कामाची इत्यंभूत माहिती त्यांना असते हे अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष अनुभवले..!

कोणतीही सरकारी इमारत बांधताना दर्जा उत्तम असला पाहिजे याचा आग्रह धरणारे आणि बांधकामाची सकाळी सहा वाजता जाऊन पाहणी करणारे अजित दादा आजपर्यंत बारामतीतील नागरिकांनी अनुभवले.. पण आज पुण्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील अनुभवले..! दादा इंजिनियर नाहीत, पण इंजिनिअरपेक्षा कमी नाहीत हे अनुभवताना त्यांनी अजित पवार हे राजकीय नेते म्हणून आजवर अनेकदा पाहिले.. परंतु बांधकामातील त्यांच्या ज्ञान कौशल्याच्या ‘दादा’गिरीने पोलीस अधिकारी देखील प्रभावित झाले.

अजित दादा हे त्यांच्या कामात दादा आहेत हे आजवर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले आणि अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवले, एवढेच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील अनुभवले.. आज मात्र एरवी आपली हुकूमत आणि दादागिरी गाजवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी देखील अनुभवले हीच आजची महत्त्वाची बातमी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर, पुणे येथील पोलीस मुख्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले, त्यानंतर त्यांनी कामाची पाहणी केली. तसेच कोवीड काळात विशेष योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांच्या वतीने तयार केलेल्या ‘माय पुणे सेफ’ ऍपसह पोलिसांच्या बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे उदघाटन केले.

मात्र यावेळी त्यांनी केलेल्या मुख्यालयाच्या पाहणीची आणि त्यानंतर ठेकेदाराला त्यातील सांगितलेल्या बारकाव्यांची जास्त चर्चा पोलिस अधिकाऱ्यांमध्ये झाली. बारामती मधील विकास कामे होत असताना बारामतीत आल्यानंतर अजित पवार हे पहाटे सहा वाजल्यापासून कामाची पाहणी करतात. हा त्यांचा शिरस्ता आहे. गेली कित्येक वर्ष त्यांची ही पद्धत आहे. तोच पायंडा ते जिथे जिथे उद्घाटनासाठी जातात तिथे तो पडलेला असतो कारण काम पाहिल्यानंतर काम आवडले की लगेच ठेकेदाराला द्यायची आणि काम आवडले नसेल, तर तो ठेकेदार कितीही जवळचा असला तरी त्याला सुनवायचे ही त्यांची पहिल्यापासून सवय आहे आज सकाळी पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना हा अनुभव आला.

एखादा ठेकेदार जिल्हा परिषद सदस्य झाला, आमदार झाला, मंत्री झाला तरीदेखील झालेल्या कामकाजावर थेट भाष्य करत नाही. मात्र अजित पवार हे एकमेव नेते आहेत की, ज्यांना कामाचा दर्जा चांगलाच लागतो आणि त्यासाठी ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. आज देखील पुण्यामध्ये त्याने ठेकेदाराला बोलावून हे काम ट्यूब लेव्हलमध्ये नाही, तुम्ही बारामतीत जाऊन पहा, मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाची पाहणी करत असतो. काम आवडले नाही, तर ते तातडीने बदलायला सांगतो. या ठिकाणी पोलिस मुख्यालयाचे काम आहे हे तरी समजून घ्यायला हवे असे सांगत त्यांनी त्यामधील छोटे छोटे बारकावे आणि छोट्या छोट्या बदलांची सूचना केली.

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारDY CM AJITDADA PAWAR
Next Post

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून कोरोनामुळे मयत सभासद व कामगारांना मदत मिळावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group