मुंबई : महान्यूज लाईव्ह
दरवर्षी मुंबईतील जुन्या इमारती पावसाच्या बळी ठरतात. काल मोसमी पावसाने मुंबईत प्रवेश करताच दिवसभर झालेल्या संततधार पावसानंतर रात्री मालाड पश्चिम भागातील मालवणी येथील एक चार मजली इमारत कोसळली. यामध्ये श नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठ जण गंभीर जखमी आहेत, तर पंधरा जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे.
मालाड मधील मालवणी येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली. ही इमारत धोकादायक होती. त्यात काही कुटुंबाचे वास्तव्य होते. रात्री अकराच्या सुमारास ही इमारत कोसळली. यात जागीच नऊ जणांचा मृत्यू झाला. आठ जणांना तातडीने शेजारील बीडीबीए दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी पालकमंत्री अस्लम शेख, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. शेख यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे का याचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली.











