इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कामाचे निमित्त सांगून घरात घुसून आई-वडील नसताना मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भिगवणनजिकच्या तक्रारवाडीतील ऋषिकेश राजेंद्र वाघ याच्यावर भिगवण पोलिसांनी बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार ऋषीकेश वाघ हा होमगार्डचे काम करतो अशी येथील माहिती आहे. याला पोलिसांकडून मात्र दुजोरा मिळालेला नाही.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, पाच जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काम सांगायचे निमित्त करून पिडीतेच्या घरात शिरून ऋषिकेश वाघ याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने आरडाओरडा केला. त्यामुळे आई वडील धावत आले तर त्यांना ढकलून ऋषिकेश वाघ याने पळ काढला.
यानंतर पीडितेने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी परिसरातील वाळू माफिया सक्रिय होते अशी माहिती सूत्रांनी दिली.











