दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यात पेट्रोल, डिझेल तसेच जिवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईचा निषेध करत केंद्र सरकारच्या विरोधात दौंड तालुका कॅाग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरीकांना जीवन जगणे मुश्किल झाले असताना केंद्र सरकार जनतेच्या विरोधात चुकीची भूमिका घेत आहे. केंद्र सरकारची धोरणांमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. भाववाढीवर केंद्रसरकारचे नियंत्रण नाही म्हणून केंद्र सरकारने केलेल्या या भाववाढीचा दौंड तालुका कॅाग्रेस आय पक्षाने निषेध नोंदवला.
दौंड तालुक्यातील चौफुला येथे आज सोमवारी ( दि.7) कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणारे केंद्र सरकार महागाई रोखण्यास अपयशी ठरले असल्याची टिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी दौंड तालुका काँग्रेस आय सोशल मीडिया अध्यक्ष स्वप्निल सोनवणे, धनंजय शितोळे, अरविंद दोरगे, इस्माईल भाई शेख, महादेव दिवेकर, सचिन रणदिवे, बापू शिंदे, नारायण खळदकर, गणेश दोरगे, करण खळदकर, मोशीन तांबोळी, अल्ताफ शेख व इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.











