माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : लाॅकडाऊनमुळे बससेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता लाॅकडाऊनमध्ये सवलत दिल्यामुळे भोर आगारातून भोर – पुणे मार्गावर भोर- परेल व भोर – पुणे – सोलापुर या मार्गासह भोरच्या ग्रामीण भागात सोमवार पासून लालपरी धावणार आहे.
पुणे जिल्हा हा चौथ्या टप्प्यातील निर्बंधात असल्याने बसमध्ये सोशल डीस्टन्स ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व बस निर्जंतुकिकरण करून सोमवार (दि. ७ जून) पासून भोर आगारातून प्रवाशांच्या सेवेसाठी विविध मार्गावर बस वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भोर आगाराचे व्यवस्थापक बालाजी सुर्यवंशी यांनी माहिती दिली.
बस सुटण्याची वेळ
● भोर – स्वारगेट
सकाळी ०६ .४५वाजता
सकाळी ०७ .४५ वाजता
सकाळी ०८ .४५ वाजता
सकाळी १० .१५ वाजता
सकाळी ११ .१५ वाजता
दुपारी १२ .१५ वाजता
दुपारी १२ .४५ वाजता
दुपारी १४ .१५ वाजता
दुपारी १६ . ३० वाजता
सायंकाळी १८ वाजता
● भोर परेल
सकाळी ९ .४५ वाजता
परेल भोर सकाळी ५ .४५
● भोर पुणे सोलापुर
सकाळी १० ४५ वाजता
सोलापुर पुणे भोर सकाळी ५ .४५
● भोर चिखलगाव धोंडेवाडी- मार्ग टिटेघर
सकाळी ०७ .३० वाजता
● भोर धोंडेवाडी
दुपारी १२ .३० वाजता व
१६ वाजता
● भोर कोर्ले
सकाळी ९ वाजता
दुपारी १३ वाजता
व सायंकाळी १६ .३०
● भोर कारी
सकाळी ८ वाजता
व दुपारी १३ वाजता
● भोर म्हसर सकाळी १० वाजता
दुपारी १५ वाजता
● भोर महूडे
सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजत
प्रवाशांच्या प्रतिसादानुसार फेऱ्यामध्ये वाढ करण्यात येईल व प्रवाश्यांच्या मागणी नुसार भोर – पुणे फेरी चालविण्यात येईल असे आगार व्यवस्थापक बालाजी सुर्यवंशी यांनी सांगितले. प्रवासी प्रतिसाद लाभल्यास या फेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवल्या जाणार असून अधिक माहितीसाठी भोर आगाराच्या ९४२२९४००९४ किंवा ८००७९७९०६१ संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक नियंत्रक एस. एन. कुंभार यांनी केले आहे.











