पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या बारा टक्क्यांच्या आसपास व ऑक्सिजन बेड 31.57 टक्क्यांच्या आसपास असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकार्यांनी चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार अत्यावश्यक सेवा सकाळी अकरा ऐवजी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने मात्र बंद राहणार असून, मॉल्स, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह बंद राहतील. मात्र रेस्टॉरंट, हॉटेल, उपहारगृहे, खानावळी, शिवभोजन थाळी या पार्सल म्हणून व होम डिलिव्हरी सेवा म्हणून सुरु राहतील.
खाजगी कार्यालय व आस्थापना यामध्ये सहकारी सार्वजनिक आणि खासगी बँका, विमा व मेडिक्लेम कार्यालय, औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालय, सर्व नोन बँकिंग वित्तीय महामंडळ, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, न्यायालय अथवा लवादाच्या संबंधित वकिलांची कार्यालय सुरू राहतील. शासकीय कार्यालयासहित सर्व कार्यालयांमधील उपस्थिती पंचवीस टक्के उपस्थिती सुरू राहील.
मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते नऊ पर्यंत परवानगी राहील, दर शनिवारी व रविवारी मैदान बंद राहतील. गर्दी नसणाऱ्या चित्रीकरणासाठी परवानगी राहील, मात्र सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच नंतर प्रवास करता येणार नाही आणि दर शनिवारी रविवारी कोणत्याही प्रकारचा प्रवास करता येणार नाही. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेळावे बंद राहतील. लग्न समारंभ जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत; अंतयात्रा, अंत्यविधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत परवानगी राहिल.
स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभेसाठी 50 टक्केसह बैठका घेता येतील. ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशी बांधकामे सुरू राहतील. कृषी आणि कृषिपूरक सेवा सोमवार ते शुक्रवार इ 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी पाच ते सकाळी पाच पर्यंत संचारबंदी लागू राहील.
व्यायाम शाळा, केशकर्तनालय, दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. या ठिकाणी पूर्वनियोजित वेळ ठरवूनच प्रवेश द्यावा लागेल. एसीचा वापर करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बसेस 50% क्षमतेने सुरू राहतील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे नियमित सुरू राहतील. मात्र संबंधित वाहनांमधून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक प्रक्रिया उद्योग असणारे घटक 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.











