बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात काल तब्बल जणांची तपासणी झाली. त्यामध्ये तालुक्यातील 49 तर इतर तालुक्यातील 6 असे 55 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकंदरीत तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे.
काल बारामती मध्ये विविध प्रयोगशाळांमध्ये 498 जणांची तपासणी झाली. यामध्ये शहरातील 14 व ग्रामीण भागातील 35 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल दिवसभरात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ज्यांचे पहिल्या डोसनंतर 84 दिवस पूर्ण झालेत अशांनाच लसीकरणाची सुविधा!
बारामतीत आज शासकीय महिला रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण होणार आहे परंतु ज्या नागरिकांचा कोबी शील्ड लस घेतलेल्या नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे आणि पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा नागरिकांनाच आज लस दिली जाणार आहे. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.











