बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव च्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे लाखे यांच्यावर आज संध्याकाळी गोळीबार झाला. बारामतीतील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविराज तावरे यांना एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना बारामतीतील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. मात्र हा गोळीबार का झाला आणि कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत. बारामतीतील बारामती हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे. माळेगावातील संभाजीनगर भागात हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. रविराज तावरे हे तेथे वडापाव विक्रीच्या स्टॉलजवळ थांबले असताना त्यांच्यासमवेत गाडीमध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यादेखील होत्या. या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्यांना लागली, मात्र फायरिंग चा आवाज त्या परिसरात इतरांनाही आला अशी माहिती सूत्रांनी दिली.
अजून या विषयी पूर्ण माहिती नाही. तसेच पोलिसांकडूनही यासंदर्भात गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी रविराज तावरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी बारामती हॉस्पिटल मध्ये पोहोचले आहेत. पुण्याहून डॉक्टरांचे पथकही बारामतीकडे निघाले आहे.











