राजेंद्र झेंडे :महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील तुकाईनगर परसिरातील
लोकाशेड येथे शिवराम इलेक्ट्रिकल या कंपनीचे शेडमध्ये अज्ञात चोरट्याने बजाज कंपनीचे एल.ई.डी. लाईट, केबल असा एकूण ३ लाख ५ हजार ४४३ रूपयांच्या साहित्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. १५ ते १६ मे दरम्यान चोरी करून हे चोरटे पसार झाले. या चोरीतील दोन आरोपींना पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले आहे.
ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. ऋषीकेश माणिक फासगे (वय १९, रा.सम्राटनगर, दौंड जि.पुणे), सोमनाथ जगन्नाथ ढवळे (वय २२ , रा. भिमनगर, दौंड जि.पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, १५ ते १६ मेच्या दरम्यान लोकाशेड येथे शिवराम इलेक्ट्रिकल या कंपनीचे शेडमध्ये अज्ञात चोरट्याने बजाज कंपनीचे एल.ई.डी. लाईट, केबल अशी साहित्यांची चोरी अज्ञात चोरांनी केल्याची घटना घडली होती.
याबाबत कंपनीचे साईट इन्चार्ज अमलियार जिमालभाई यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार या ठिकाणी असेलल्या सी.सी.टि.व्ही. फुटेज सहाय्याने शोध घेऊन पोलीसांनी तपासाची सुत्रे हलवली होती.
दौंड शहरातील ऋषीकेश माणिक फासगे, सोमनाथ जगन्नाथ ढवळे व एक विधीसंघर्षित बालक यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार याच्या मदतीने हा चोरीचा गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे.
पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेले बजाज कंपनीचे एल.ई.डी. लाईटचे ८७ हजार रुपयांचे २६ नग असा मुद्देमाल तप्त करून दोन आरोपींना दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. दरम्यान या आरोपींनी आणखी जबर गुन्हे केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे अधिक तपास करीत आहेत.
पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड आदींनी यांनी ही कारवाई करून आरोपींना मुद्देमालासह अटक केले.











