इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोनिची रुग्णसंख्या दररोज कमी जास्त होताना दिसते. मात्र गेल्या दोन दिवसापासून ही संख्या आणखी कमी होत असून, मृत्यूचे प्रमाण मात्र वाढताना दिसत आहे. इंदापूर तालुक्यात 46 कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि हे सर्व सहा जण ग्रामीण भागातील आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात तब्बल 373 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून येथील ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण 2.34 एवढे अधिक आहे.
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या तपासणीमध्ये पळसदेव येथील 35 वर्षीय महिला, पोंदकुले वाडी येथील 85 वर्षीय महिला, पिलेवाडी येथील 21 वर्षीय महिला, पोंदकुले वाडी येथील 47 वर्षीय महिला, भिगवण येथील 35 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, कुंभारगाव येथील 48 वर्षीय महिला, राजेगाव येथील 33 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, पंधरा वर्षीय मुलगी, डाळज नंबर 2 येथील 18 वर्षीय युवती 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मदनवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 40 वर्षीय महिला, शेटफळगडे येथील 65 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, भावडी येथील 35 वर्षीय महिला, अंथुर्णे येथील 31 वर्षीय पुरुष, निमगाव येथील 34 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, पंधरा वर्षीय मुलगी, कौठळी येथील 24 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, माळवाडी नंबर 1 येथील 55 वर्षीय पुरुष, सराफवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
रुई येथील 20 वर्षीय पुरुष, कौठळी येथील 23 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 50 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, अगोती नंबर एक येथील 62 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, शेळगाव येथील 27 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 40 वर्षीय पुरुष, लालपुरी येथील 35 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगी, लाखेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, गोखळी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तावशी येथील 65 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, बेलवाडी येथील 23 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, भोडणी येथील 40 वर्षीय महिला, भाटनिमगाव येथील 27 वर्षीय महिला, बावडा येथील 19 वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील 57 वर्षीय पुरुष व शेटफळ हवेली येथील 27 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.











