शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरुर तालुक्यातील महत्वाचे नेते असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल काही वेळापूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे मागील आठवड्यात बांदल यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,या प्रकरणात त्यांना न्यायालयाने तात्पुरता जमीन मंजूर केलेला असताना काल रात्री उशिरा बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र कोणतीही पोलिसांनी पूर्वकल्पना न देता शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आणि थेट रवानगी शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस तरी मंगलदास बांदल यांना जेलमध्येच काढावा लागणार आहे. शिक्रापूर पोलिसांनी याबाबत मोठी गोपनीयता पाळली आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दत्तात्रय मांढरे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार मंगलदास बांदल यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून पैशाची खूप गरज असे आहे असे सांगून खोटे खरेदीखत करून त्याआधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून आठ लाख रुपये कर्ज प्रकरण करून स्वतःच्या फायद्याकरता वापरले.
पुन्हा या मिळकतीवर बनावट पुरवणी दस्तऐवज तयार करून व कुलमुखत्यारपत्र फिर्यादीच्या संमतीशिवाय वापर करून एक कोटी 85 लाख रुपये 25 लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः करता वापरले आहे व हप्ते न भरता दोन कोटी 50 लाख रुपये थकवले आहेत. त्यावरून मंगलदास बांदल यांच्या विरोधात त्यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक केली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करत आहेत. दरम्यान याप्रकरणी आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास शिक्रापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











