• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवारांबद्दल बोलण्याअगोदर निलेश राणे..जरा वडीलांचाही सल्ला घेत जा..

Maha News Live by Maha News Live
May 19, 2020
in मुंबई, कोकण, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
पवारांबद्दल बोलण्याअगोदर निलेश राणे..जरा वडीलांचाही सल्ला घेत जा..

राणेंच्या एकेरी टिकेला रोहित पवारांचा जोर का झटका धीरेसे..

पुणे : महान्यूज लाईव्ह
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आक्रमक नेते असले तरी कधीही खालच्या पातळीवरील टिका करीत नाहीत, वयाने मोठ्या असलेल्या लोकांबद्दल ते एकेरी बोलत नाहीत, त्यामुळे निलेश राणे यांनी किमान आपल्या वडीलांचा तरी आदर्श ठेवावा अशा खोचक शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राणे यांच्या खालच्या शब्दातील टिकेला संमजस व संस्कृतीला साजेशे उत्तर दिले आहे.
गेल्या चार दिवसांत राणे-पवार यांच्यातील ट्विटर युध्द चांगलेच गाजले आहे. राज्यात या ट्विटवॉरची राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. यामध्ये सुरवातीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगाच्या मदतीबद्दल व एकूणच राज्यातील व्यवसायांबद्दल मदतीची अपेक्षा करणारे आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनात साखर उद्योग सध्याच्या संकटातून वाचण्यासाठी सहा कलमी उपाययोजना त्यांनी मोदी यांना सुचवल्या. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकच ट्विट करीत थेट शरद पवार यांच्यावरच टिका केली.

साखर उद्योगाला एवढी मदत करूनही पुन्हा साखर उद्योगच वाचवा? असे आवाहन कसे करता अशा अर्थाने निलेश राणे यांनी ट्विट केले. मात्र हे ट्विट पोस्ट होताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचकपणे निलेश राणे यांना उद्देशून फक्त साखर उद्योगाला नव्हे तर कुक्कुटपालन व्यवसायाला देखील मदत करण्याचे आवाहन पवारसाहेबांनी केलेय असे प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांचे रिट्विट निलेश राणे यांना चांगलेच झोंबले.

कुक्कुटपालन या शब्दामुळे वर्मी घाव लागलेल्या राणेंना नेटकऱ्यांनीही चांगलेच हैराण केले. त्यामुळे चिडलेल्या निलेश राणे यांनी रोहित पवार यांचा शेंबडे पोर असा उल्लेख करीत खालच्या पातळीवर जाऊन एकेरी शब्दात टिका केली. त्यानंतर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या सोशल मिडियातील कार्यकर्त्यांत व राणे यांच्या समर्थकांमध्ये सोशल मिडियात शाब्दिक युध्द रंगले. त्यावर रोहित पवार यांनी निलेश राणे यांना नारायण राणेंकडे बोट दाखवून सल्ला घेण्याची सूचना देऊन पुन्हा डिवचले आहे. मात्र या ट्विटमुळे राणे यांना अत्यंत चांगले, संस्कृतीदर्शक उत्तर मिळाल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली.

Tags: coronaviruscovid19fight on twitterpolitics in maharashtraRohit Pawar VS Nilesh Rane
Next Post
मोबाईलपाठोपाठ चीनमधला बूट येतोय भारतात…

मोबाईलपाठोपाठ चीनमधला बूट येतोय भारतात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group