शिरूर : महान्युज लाईव्ह
तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओंकार गणपत दरेकर (रा. मांडवगण फराटा) यांना शेतात पाणी देण्यासाठी गेले असता, नांगरलेल्या शेतात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
याबाबत त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून सदर मयताचे वय अंदाजे ४५ वर्षाचे असून, दाढी वाढलेली, गळ्यात चार पदरी काळा धागा, निळ्या रंगाची जीन्स पँट, फिकट पिवळा रंगाचा टी शर्ट अशा स्थितीत सदर मृतदेह आढळून आला.
या मृत व्यक्तीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास शिरूर पोलीस स्टेशन 02138222139, सहाय्यक फौजदार आर.एस. साबळे 9145377791 या नंबरवर संपर्क करावा. याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण पोलीस दुरक्षेत्राचे सहायक फौजदार आर. एस. साबळे, पोलीस नाईक राहुल भागवत, अक्षय काळे, होमगार्ड राहुल चौगुले हे करीत आहेत.











