बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल केवळ 247 जणांच्या कोरोना तपासण्या झाल्या. त्यामध्ये एकूण इतर तालुक्यासह 65 जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामध्ये बारामती तालुक्यातील 59 जणांचा समावेश असून, यामध्ये ग्रामीण भागातील 35 व शहरी भागातील 24 रुग्णांचा समावेश आहे.
बारामती तपासण्या कमी झाल्या म्हणून रुग्ण कमी दिसत असले तरी देखील एकूणच कोरोनाची दुसरी लाट बारामतीमध्ये ओसरत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
काल बारामतीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील 61 वर्षीय पुरुष, आठ वर्षीय मुलगा, आमराई येथील 50 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील दहा वर्षीय मुलगी, 90 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगा, वीस वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, बारामती हॉस्पिटल येथील 26 वर्षीय पुरुष, यादगार सिटी येथील 40 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 45 वर्षीय महिला, खंडोबा नगर येथील चार वर्षीय मुलगा, महादेव मळा येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
साळवे नगर येथील 28 वर्षीय महिला, मोरगाव रोड येथील 40 वर्षीय पुरुष, आमराई येथील 43 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 36 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 51 वर्षीय महिलाष 29 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 57 वर्षीय पुरुष व, येथील 14 वर्षीय मुलगी, जळोची येथील 13 वर्षीय मुलगी, 15 वर्षीय मुलगीष टीसी कॉलेज येथील 13 वर्षीय मुलगी, येथील 17 वर्षीय युवती, सूर्यनगरी येथील 37 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील वीस वर्षीय पुरुष, जळोची येथील 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे
देशमुख वस्ती पाटस रोड येथील 35 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवती, माळेगाव रोड सातव वस्ती येथील 21 वर्षीय महिला, दादा पाटील नगर तांदुळवाडी येथील 15 वर्षीय मुलगा, पुष्पक अपार्टमेंट टि सी कॉलेज शेजारी वसंत नगर येथील 52 वर्षीय महिला, कृष्ण विजय बंगला बुरुड हौसिंग सोसायटी येथील 64 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, आमराई येथील 26 वर्षीय महिला, झगडे गॅरेज शेजारी 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
विवेकानंद नगर येथील 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, दुर्गा थिएटर शेजारी तीस वर्षीय महिला, खंडोबानगर येथील तीस वर्षीय पुरुष, रुई हॉस्पिटल शेजारी 38 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील 21 वर्षीय पुरुष, मन्मत कार्यालयासमोरील 61 वर्षीय पुरुष, सिटी इन चौक येथील 32 वर्षीय पुरुष, आमराई येथील 67 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.











