दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या युवक कार्यकत्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसापुर्वी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष माऊली आहेर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा तालुक्यातील काही युवकांनी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यापासून आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे खुद्द उध्दव ठाकरे असल्याने आणि त्यातच दौंड शिवसेनेचे नेते महेश पासलकर यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यापासून सध्या तालुक्यातील विविध पक्षाचे युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत.
तालुक्यातील विविध पक्षात काम करणारे साहेबराव शितोळे, निखिल शितोळे, रितेश शितोळे, अमोल कुर्हाडे, शुभम ढमे यांच्यासह अनेक युवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य करणार असल्याचे यावेळी कार्यकत्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना तालुका विभाग प्रमुख हनुमंत निगडे, माऊली आहेर, शंकर शितोळे, प्रशांत शितोळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.











